मानसिक, डायबिटीस, कर्करोग रुग्णांचे सर्वेक्षण: ठिकठिकाणी सेंटर उभारणार; पालिका कॅन्सर प्रतिबंधक मॉडेल राबवणार

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या ‘आरोग्यम कुटुंबम’ योजनेअंतर्गत आता मानसिक आरोग्य आणि कर्करोग प्रतिबंधक उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे.
मानसिक, डायबिटीस, कर्करोग रुग्णांचे सर्वेक्षण: ठिकठिकाणी सेंटर उभारणार; पालिका कॅन्सर प्रतिबंधक मॉडेल राबवणार
PM

मुंबई : मानसिक रुग्ण, डायबिटीस रुग्ण, कर्करोग रुग्णांचा शोध घेत त्यांच्यावर वेळीच उपचार करणे शक्य व्हावे, यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री आरोग्य आपल्या दारी योजने अंतर्गत हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आरोग्यसेविका आणि आशा वर्कर्सच्या माध्यमातून सर्वेक्षण होणार असून, चाचणीसाठी ठिकठिकाणी सेंटर सुरू करण्यात येणार आहे. तसेच कॅन्सरमुक्त मुंबईसाठी कॅन्सर प्रतिबंधक मॉडेल राबवण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

मुंबईत हृदयरोग, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे रुग्ण वाढले असून, मुंबई महापालिकेच्या वतीने २०२३ मध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात हृदयरोग, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे रुग्ण मुंबईत वाढले असून, त्याबाबत योग्य ती काळजी घेऊन उपचार घ्यावे आणि या आजारांना प्रतिबंध करता येईल, याबाबत काळजी घेण्याची सूचना केल्या आहेत. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे हृदयरोग व उच्च रक्तदाबाच्या आजाराचे प्रमाण वाढले असल्याचे समोर आले असून, मुंबईत होणाऱ्या एकूण मृत्यूंमध्ये तब्बल २५ टक्के मृत्यू हे हृदयरोग आणि उच्च रक्तदाबाचे असल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर लिकेनेही मुंबईत आरोग्य सेविका आणि आशा वर्कर्सच्या माध्यमातून सर्वेक्षणात १० लाख ४५ हजार मुंबईकरांची तपासणी केली. या तपासणीत ९ हजार ६०० जणांमध्ये म्हणजे ३५ टक्के मुंबईकरांचे उच्च रक्तदाबाचे निदान झाले होते. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. आता या सर्वेक्षणाबरोबर मनोरुग्ण आणि कर्करोगग्रस्तांचाही समावेश करण्यात आला आहे.

‘आरोग्यम कुटुंबम’ योजना राबवणार

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या ‘आरोग्यम कुटुंबम’ योजनेअंतर्गत आता मानसिक आरोग्य आणि कर्करोग प्रतिबंधक उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे. सर्वेक्षणात हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाबासह मानसिक आरोग्यावर भर दिला जाणार आहे. कर्करोगामध्ये तोंड, स्तन आणि सर्व्हायकल कर्करोगाची प्राथमिक तपासणी केली जाणार आहे. यासाठी सरकारी आणि खासगी क्षेत्राची मदत घेतली जाणार आहे. त्याबरोबर ज्येष्ठ आणि इतर असाध्य आजार असलेल्यांसाठी घरच्या घरी रक्ताच्या चाचण्या करण्याची योजना तयार केली जाणार आहे. यात कोणत्या चाचण्या केल्या जाव्यात, यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in