मोतीबिंदूनंतर दृष्टी सुधारल्याचे सर्वेक्षणात समोर

५० वर्षांवरील व्यक्तींचा सहभाग होता
मोतीबिंदूनंतर दृष्टी सुधारल्याचे सर्वेक्षणात समोर

मुंबई : प्रगत मोतिबिंदू उत्पादनांचा वापर केलेल्या जगभरातील लोकांनी मोतिबिंदू शस्त्रक्रियेनंतर दृष्टी व आयुष्याचा दर्जा सुधारत असल्याचा अनुभव सर्वेक्षणात नमूद केला आहे. ॲल्कॉन ह्या नेत्रोपचारांच्या क्षेत्रातील जागतिक कंपनीने ‘ॲल्कॉन आय ऑन कॅटरॅक्ट’ या सर्वेक्षणाचे निकाल जाहीर केले. हे सर्वेक्षण मार्च-एप्रिल २०२३ ह्या काळात भारतासह १० देशांमध्ये, दृष्टी व मोतिबिंदू ह्यासंदर्भातील माहिती प्राप्त करण्याच्या उद्देशाने घेण्यात आले होते. त्यात ५० वर्षांवरील व्यक्तींचा सहभाग होता. दृष्टी स्पष्ट राहावी, ह्या हेतूने मोतिबिंदू शस्त्रक्रियेवर पैसा खर्च करण्यास ९० टक्के भारतीय तयार असतात. चष्मा घातल्यामुळे वृद्ध झाल्यासारखे वाटते, असे ५४ टक्के लोकांनी नमूद केले. तसेच ५० वर्षांवरील ९२ टक्के लोक लेन्ससाठी खर्च करण्यास तयार आहेत, असे मत काहींनी या सर्वेक्षणात व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in