अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या लाडक्या 'फज'चे निधन; चाहते झाले भावुक

अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या निधनानंतर त्याचा लाडका श्वान 'फज'चे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते
अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या लाडक्या 'फज'चे निधन; चाहते झाले भावुक

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येने संपूर्ण देश हादरला होता. ध्यानीमनी नसताना या घटनेमुळे त्याच्या चाहत्यांना चांगलाच फटका बसला होता. यावेळी त्याचा लाडका श्वान 'फज'चे त्याच्यासोबतचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. नुकतेच, सुशांतच्या बहिणीने आता ट्विट करत फजच्या निधनाची माहिती दिली आहे. यामुळे सुशांतसिंग राजपूतच्या चाहत्यांनीडॆहील यावर दुःख व्यक्त केले आहे.

सुशांतसिंग राजपूतची बहीण प्रियांका सिंगने ट्विटरवर त्याचे फोटो ट्विट करत लिहिले की, "तू खूप दूर गेलास! तू तुझ्या मित्राजवळ स्वर्गात गेलास. आपण लवकरच भेटू, तोपर्यंत... अतिशय वाईट वाटतंय" याचसोबत तिने स्वतःचा आणि फजचा, तर सुशांतसिंग राजपूत आणि फजचा असे दोन फोटो शेअर केले आहेत. तिने केलेल्या या ट्विटवर सुशांतसिंगच्या चाहत्यांनी फजला श्रद्धांजली वाहिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in