Sushma Andhare : सुषमा अंधारेंचे विभक्त पती शिंदे गटात; सुषमा अंधारे म्हणाल्या...

उद्धव ठाकरे यांच्या गटातील प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) सध्या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.
Sushma Andhare : सुषमा अंधारेंचे विभक्त पती शिंदे गटात; सुषमा अंधारे म्हणाल्या...
Published on

उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे या नेहमीच चर्चेत असतात. यावेळी त्या चर्चेत आहेत कारण, त्यांचे पूर्वीचे पती वैजनाथ वाघमारे हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. वैजनाथ वाघमारे यांनी स्वतःच याबद्दल माध्यमांना माहिती दिली. एकनाथ शिंदेची भूमिका मला पटली म्हणून मी शिंदे गटात प्रवेश करत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केली आहे.

माध्यमांशी बोलताना वैजनाथ वाघमारे यांनी सांगितले की, "आम्ही दोघे अनेक वर्षांपासून विभक्त राहातो. आमचा काहीही संबंध नाही. एकनाथ शिंदेंची भूमिका पटली म्हणून मी शिंदे गटात प्रवेश करत आहे. एकनाथ शिंदेंसोबत चर्चा करताना त्यांच्यासमोर काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी हो म्हटलं आणि आज प्रवेश करत आहे." पुढे त्यांनी 'सुषमा अंधारे काही तोफ वगैरे नाही. त्यांना घडवणारा, वैचारिक दृष्ट्या घडवणारा मीच आहे.' असा दावादेखील केला.

सुषमा अंधारे यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हंटले की, "माझे पती आणि मी गेली ५-६ वर्षे विभक्त राहतो. हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. शिंदेंच्या पक्षात जाणाऱ्यांना माझ्या शुभेच्छाच आहेत. मी माझ्या पक्षासोबत कायम राहणार आहे. त्यामुळे माध्यमांनी ही बातमी फार महत्वाची मानू नये."

logo
marathi.freepressjournal.in