"अजित पवारांची स्क्रिप्ट भाजपने..." सुषमा अंधारेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका

अजित पवार यांच्या नाराजीनाट्यावर गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार चर्चा सुरु असताना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली भाजपवर टीका
"अजित पवारांची स्क्रिप्ट भाजपने..." सुषमा अंधारेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका

गेल्या काही दिवसांपासून राजय्त अजित पवार यांच्या नाराजीनाट्यावर जोरदार चर्चा सुरु आहेत. अशामध्ये स्वतः अजित पवार यांनी माध्यमांसमोर येऊन हे सर्व गैरसमज पसरवण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, तरीही राजकीय वर्तुळात ते कोणता बॉम्ब फोडणार? याची चर्चा अद्यापही सुरूच आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचा नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, "अजित पवारांची स्क्रिप्ट ही भाजपने लिहिली होती" अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, "वज्रमूठ सभा आणि खेड, मालेगाव येथील सभांमधून महाविकास आघाडीला जो वाढता प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे भाजपला भीती वाटत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची सध्याची विधाने तपासून पाहिली, तर ती विधाने पुरेशी बोलकी आहेत. आधी त्यांनी काय विधाने केली आणि त्यानंतर काय विधाने केली. या सगळ्या घडामोडींमध्ये देवेंद्र फडणवीस मात्र रहस्यमयीपणे मौन बाळगून आहेत. त्यामुळे कितीही अंग झटकण्याचा प्रयत्न केला, तरीही अजित पवारांच्या नाराजीनाट्याचा स्क्रिप्ट रायटर कोण? याचे उत्तर देवेंद्र फडणवीस चांगल्याप्रकारे देऊ शकतात." असे थेट आरोप त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in