

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केल्यानंतर नुकताच मुंबई गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आलेला कुख्यात अमली पदार्थ तस्कर सलीम डोला हा चौकशीदरम्यान तपास अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
डोला सध्या मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-३ च्या कोठडीत असून त्याची पोलीस कोठडी सोमवारी संपणार आहे. पुढील आदेशासाठी त्याला किल्ला कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युनिट-३ ने केलेल्या चौकशीत डोला याने असा दावा केला आहे की, अमली पदार्थांच्या तस्करीतून मिळालेल्या पैशातून त्याने दुबईत खरेदी केलेल्या मालमत्ता आधीच विकल्या गेल्या आहेत. तपास अधिकारी आता या दाव्याची पडताळणी करण्याचा आणि त्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक व्यवहारांचा माग काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
डोला तुर्कीमध्ये ‘आयहान शेख’ या नावाने राहत होता; चौकशीदरम्यान हा तपशील उघड झाला. गुन्हे शाखेचे अधिकारी त्याच्या परदेशातील हालचाली, आर्थिक व्यवहाराची तपासणी पोलीस करत आहेत.