अखेर 'तो' संशयित दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात; एटीएससची मोठी कारवाई

चीन पाकिस्तानमधून दहशतवादी कारवाईचे प्रशिक्षण घेतलेल्या संशयास्पद व्यक्ती सध्या मुंबईत असल्याचा मुंबई पोलिसांना आला होता मेल
अखेर 'तो' संशयित दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात; एटीएससची मोठी कारवाई
Published on

महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने सरफराज मेमन या संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात यश आले आहे. त्याला इंदोरमधून ताब्यात घेण्यात आले. सध्या त्याची चौकशी करण्यात येणार असून पुढील तपास सुरु आहे. राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडून (एनआयए) मुंबई पोलिसांना एक मेल आला होता. यामध्ये चीन, पाकिस्तान आणि हाँगकाँगमध्ये दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेतलेल्या सरफराज मेमनबद्दल माहिती देण्यात आली होती.

मुंबई पोलिसांच्या मेलमध्ये लिहिले होते की, संशयित दहशतवादी सरफराज मेमन हा इंदोरचा असून तो सध्या मुंबईत पोहचला आहे. तो मुंबईमध्ये घातपात करण्याच्या प्रयत्नात असल्याचे एनआयएने सांगितले होते. यामुळे मुंबई पोलिसांसह अन्य यंत्रणाही सज्ज झाल्या होत्या आणि तेव्हापासून शोध मोहीम सुरु होती. ही व्यक्ती भारतासाठी धोकादायक असल्याचेदेखील या मेलमध्ये सांगितले होते. तसेच त्याची ओळख पटावी यासाठी त्याचे लायन्स, परवाना, व्हिसासह आधार कार्डची प्रतही मुंबई पोलिसांना मेल करण्यात आली होती.

logo
marathi.freepressjournal.in