विनायक मेटेंच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय; शिवसंग्राम’च्या कार्यकर्त्याचा दावा

३ ऑगस्टला विनायक मेटे यांच्या गाडीच्या मागे एक वाहन होते, तर समोर आयशर ट्रक होता.
विनायक मेटेंच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय; शिवसंग्राम’च्या कार्यकर्त्याचा दावा
Published on

शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे रविवारी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघातात निधन झाले. त्यांच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय ‘शिवसंग्राम’च्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. याप्रकरणी संपूर्ण चौकशीची मागणी मेटे यांच्या पत्नीने केली आहे. यानंतर एक ऑडिओ क्लिप समोर आली असून, त्यामुळे मेटेंच्या अपघाताबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. ३ ऑगस्टला विनायक मेटे यांच्या गाडीच्या मागे एक वाहन होते, तर समोर आयशर ट्रक होता. त्यावेळी दोन-अडीच किलोमीटर ओव्हरटेकचा खेळ सुरू होता; पण विनायक मेटे यांनी ट्रकला जाऊ द्या, आपली गाडी सुरक्षित चालवा, अशा सूचना चालकाला दिल्या होत्या, असा खळबळजनक खुलासा त्यावेळी त्यांच्याच गाडीत बसलेले ‘शिवसंग्राम’चे कार्यकर्ते अण्णासाहेब मायकर यांनी ऑडिओ क्लिपद्वारे केला आहे.अण्णासाहेब मायकर हे विनायक मेटेंचे सहकारी आहेत. ३ ऑगस्टला ते मेटे यांच्यासोबत गाडीत होते. त्यांचा आणि अन्य एका कार्यकर्त्यांच्या संवादाची ऑडिओ क्लिपही समोर आली आहे. यात कार्यकर्त्याने माग काढणाऱ्या गाडीचा फोटो ओळखला आहे. ही गाडी पुण्याची असून ३ ऑगस्टला गाडीचे लोकेशन काय होते हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. या गाडीची सखोल चौकशी होणार असून, मुख्यमंत्र्यांनीही अपघात प्रकरणाच्या मुळाची जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

मेटेंचा चालक सुट्टीवर

विनायक मेटे यांचा अपघात १४ ऑगस्ट रोजी झाला. त्या दिवशी मात्र त्यांचा चालक समाधान वाघमोडे हा सुट्टीवर होता, असे समजते. समाधान वाघमोडेच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे तो त्याच्या गावी गेला होता. त्याच्या जागेवर एकनाथ कदमला चालक म्हणून बोलावण्यात आले होते.

logo
marathi.freepressjournal.in