अभिनेत्री स्वरा भास्कर मुंबईतून निवडणूक लढवण्याची शक्यता; काँग्रेस 'या' मतदरासंघातून तिकीट देणार?

लोकसभा निवडणुकीत राजकीय नेत्यांसोबत अभिनेते, अभिनेत्री निवडणूक लढवत असतात. नागरिकांना आपल्याकडे आकर्षित करायला राजकीय पक्ष उत्सुक असतात.
अभिनेत्री स्वरा भास्कर मुंबईतून निवडणूक लढवण्याची शक्यता; काँग्रेस 'या' मतदरासंघातून तिकीट देणार?
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : लोकसभा निवडणुकीत राजकीय नेत्यांसोबत अभिनेते, अभिनेत्री निवडणूक लढवत असतात. नागरिकांना आपल्याकडे आकर्षित करायला राजकीय पक्ष उत्सुक असतात. त्यामुळे राजकीय पक्ष अभिनेते, अभिनेत्रींना तिकीट देतात. आता या यादीत प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिचे नाव जोडण्याची शक्यता आहे. तिला काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

मुंबईतील उत्तर-मध्य मतदारसंघामधून काँग्रेसकडून स्वरा भास्कर हिच्या नावाची चाचपणी सुरू आहे. तिच्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज बब्बर यांच्या नावाचा विचारही काँग्रेसकडून सुरू आहे. काँग्रेसला मुंबईतील केवळ एक जागा मिळण्याची शक्यता आहे. मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघ काँग्रेसला मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. इथून उमेदवारीसाठी स्वरा भास्करचे नाव आघाडीवर आहे. तिने दिल्लीमध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांची भेट घेतल्याचीही माहिती समोर येत आहे. स्वरा भास्करप्रमाणेच काँग्रेसकडून राज बब्बर यांच्या नावाचीही चाचपणीही सुरू आहे. मात्र मतदारसंघातील तरुण मतदारांचा विचार करता स्वरा भास्करच्या नावाला झुकतं माप मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात भाजपच्या पूनम महाजन या विद्यमान खासदार आहे. त्यांनी मागच्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा पराभव केला होता. मात्र शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे येथील समीकरणे बदलली आहेत. या लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघांत भाजपचे दोन मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत, तर काँग्रेस आणि ठाकरे गटाचे प्रत्येकी एका मतदारसंघात आमदार आहेत. मात्र बाबा सिद्धिकी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काँग्रेसच्या झिशान सिद्धिकी यांच्या भूमिकेबाबत संभ्रम आहे. त्यामुळे येथे चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in