स्वाईन फ्लू, काळजी घ्या! गर्दीत जाणे टाळा, मास्कचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन

स्वाईन फ्लूच्या रुग्णाचे वेळीच निदान होऊन वेळीच उपचार करणे शक्य व्हावे यासाठी कस्तुरबा रुग्णालयात चाचणी करण्यात येते.
स्वाईन फ्लू, काळजी घ्या! गर्दीत जाणे टाळा, मास्कचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन

मुंबई : हिवाळ्यात स्वाईन फ्लूचा प्रसार होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे ताप, अंगदुखी, थकवा, अतिसार अशी लक्षणे निदर्शनास येताच, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावे, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी केले आहे. सध्या स्वाईन फ्लूचे १० ते १२ रुग्ण आढळून येत असून त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावे, गर्दी जाणे टाळावे, गरज पडल्यास मास्कचा वापर करावा, असे आवाहन डॉ. दक्षा शहा यांनी केले आहे.

स्वाईन फ्लू हा सामान्य फ्लूसारखा आहे. कुठल्याही प्रकारचा फ्लू आहे असे वाटल्यास योग्य ती खबरदारी घ्यावी, घरात एक दोन दिवस आराम करावा, हात स्वच्छ धुवावेत अशा प्रकारची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

स्वाईन फ्लू हा ‘इन्फ्लुएन्झा’ विषाणूंपासून होणार आजार असून याचा प्रादुर्भाव डुकरांपासून होतो. हा श्वसनसंस्थेचा आजार असून हवेमार्फत खोकताना, शिंकताना याचा प्रसार होतो. रुग्णाच्या संपर्कात राहिल्यास नाका-तोंडाद्वारे हे विषाणू शरीरात पोहोचतात. त्यामुळे रुग्णाच्या संपर्कात आल्यास त्यालाही स्वाईन फ्लूची लागण होते.

स्वाइन फ्लूची लक्षणे

ताप, घसा खवखवणे, अंगदुखी, थकवा, अतिसार, उलट्या, अचानक तोल जाणं, श्वसनाचा त्रास, मुलांची त्वचा निळसर होणे, अंगावर पुरळ येणे.

अशी घ्या काळजी

- तीव्र आणि जास्त दिवस लक्षणे असल्यास घरतच क्वारेंटाईन रहा - गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, शक्यतो मास्क वापरा

- वारंवार हात धुवा, सामाजिक अंतर पाळा

- तीव्र लक्षणे असल्यास डॉक्टरच्या सल्ल्याने लक्षणानुसार उपचार घ्या

- सहव्याधी, ज्येष्ठ, लहान मुलांची विशेष काळजी घ्या

स्वाईन फ्लूच्या चाचणीसाठी २५० किट्स

स्वाईन फ्लूच्या रुग्णाचे वेळीच निदान होऊन वेळीच उपचार करणे शक्य व्हावे यासाठी कस्तुरबा रुग्णालयात चाचणी करण्यात येते. थंडीत स्वाईन फ्लूचा प्रसार होण्याचा धोका लक्षात घेता स्वाईन फ्लूच्या चाचणीसाठी २५० किट्स खरेदी करण्यात येणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in