स्वाइन फ्लूचा धोका कायम ; सात दिवसांत आढळले ८० रुग्ण

कोरोनाच्या चौथ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्यानंतर मुंबईकरांना किंचितसा दिलासा मिळाला
 स्वाइन फ्लूचा धोका कायम ; सात दिवसांत आढळले ८० रुग्ण

मुंबईला स्वाइन फ्लूचा घट्ट विळखा बसला असून, गेल्या सात दिवसांत (१ ते ७ ऑगस्ट) तब्बल ८० रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर मलेरिया, लेप्टो, डेंग्यूच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे.

कोरोनाच्या चौथ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्यानंतर मुंबईकरांना किंचितसा दिलासा मिळाला असतानाच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, मुंबईत मलेरिया, लेप्टो, डेंग्यू, कावीळ, गॅस्ट्रो व स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. ताप, खोकला, डोके दुखणे, अतिसार आणि उलटी येणे ही स्वाइन फ्लूची लक्षणे आहेत.गेल्या महिनाभरापासून स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढले असून, ही वाढ आणखीन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लूच्या चाचण्या करण्यात येणार असून, तसे निर्देश खासगी रुग्णालयांना दिल्याचे मुंबई महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल ठेवणे, हात स्वच्छ धुवावे, डोळे, नाक व तोंडाला हात धुतल्याशिवाय स्पर्श करू नये, गर्दीत जाणे टाळावे व डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in