तहव्वूर राणाची पोलिसांनी केली ८ तास चौकशी; तपासात असहकार्य केल्याचा आरोप

मुंबई : मुंबईत झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर हुसेन राणा याची मुंबई गुन्हे शाखेच्या एका पथकाने नवी दिल्लीत, तब्बल आठ तास चौकशी केली, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. चौकशीदरम्यान राणा उडवाउडवीची उत्तरे देत होता आणि सहकार्य करत नव्हता, असे अधिकाऱ्याने सांगितले.
तहव्वूर राणा
तहव्वूर राणासंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबईत झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर हुसेन राणा याची मुंबई गुन्हे शाखेच्या एका पथकाने नवी दिल्लीत, तब्बल आठ तास चौकशी केली, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. चौकशीदरम्यान राणा उडवाउडवीची उत्तरे देत होता आणि सहकार्य करत नव्हता, असे अधिकाऱ्याने सांगितले.

तहव्वूर हुसेन राणा सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) ताब्यात आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या चार अधिकाऱ्यांच्या पथकाने राणाची चौकशी केली. त्याच्या दहशतवादी हल्ल्याच्या कटातल्या कथित भूमिकेबाबत विचारणा केली गेली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

६४ वर्षीय पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन व्यावसायिक राणा याला २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील कथित भूमिकेसाठी अमेरिकेहून नुकतचे भारतात प्रत्यार्पित करण्यात आले. सध्या तो दिल्लीतील एनआयएच्या ताब्यात आहे.

राणाची मुंबई हल्ल्यातील कटातली भूमिका त्याचा बालपणीचा मित्र आणि सहआरोपी डेव्हिड हेडली याच्या चौकशीत उघड झाली होती. २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी रेल्वे स्थानक, दोन आलिशान हॉटेल्स आणि एका ज्यू केंद्रासह अनेक ठिकाणी एकाचवेळी हल्ले केले होते. हे दहशतवादी समुद्रमार्गे मुंबईत दाखल झाले होते. हा हल्ला जवळपास ६० तास चालला आणि त्यात १६६ जणांचा बळी गेला.

राणावर आरोप आहे की त्याने डेव्हिड हेडली उर्फ दाऊद गिलानी, तसेच लष्कर-ए-तोयबा आणि हरकत-उल-जिहादी-इस्लामी या नामांकित दहशतवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांसह भारताची आर्थिक राजधानी मुंबईवर तीन दिवस चाललेला दहशतवादी हल्ला घडवून आणण्यासाठी कट रचला.

logo
marathi.freepressjournal.in