भाडे नाकारणाऱ्या ऑटोरिक्षा, टॅक्सीचालकांवर कारवाई करा; ‘वॉचडॉग’ फाऊंडेशनची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

भाडे नाकारणाऱ्या ऑटो रिक्षा, टॅक्सीचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी ‘वॉचडॉग’ फाऊंडेशनने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
भाडे नाकारणाऱ्या ऑटोरिक्षा, टॅक्सीचालकांवर कारवाई करा; ‘वॉचडॉग’ फाऊंडेशनची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : शहर आणि उपनगरातील ऑटोरिक्षा, टॅक्सीचालक जवळचे भाडे नाकारतात. यामुळे विशेषत: पावसाळ्यात मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे भाडे नाकारणाऱ्या ऑटो रिक्षा, टॅक्सीचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी ‘वॉचडॉग’ फाऊंडेशनने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

ऑटोरिक्षा, टॅक्सीचालक सर्रासपणे जवळचे भाडे नाकारतात. त्यामुळे महिला, वयोवृद्ध नागरिक यांना त्रास सहन करावा लागतो. विशेषत: पावसाळ्यात ऑटोरिक्षा, टॅक्सीचालक प्रवाशांना भाडे स्वीकारण्यास नकार देत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी तक्रारी संघटनेकडे केल्या आहेत. त्यामुळे मुंबई वाहतूक पोलिसांनी ऑटोरिक्षा, टॅक्सीचालकांवर करवाई करावी, अशी मागणी वॉचडॉग फाऊंडेशनने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मुंबई वाहतूक पोलिसांनी प्रवाशांना त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक करण्यासाठी जनजागृती मोहिमा राबवावी. तसेच ऑटोरिक्षा, टॅक्सीचालकांनाही याबाबत माहिती द्यावी. त्याचप्रमाणे प्रमुख रेल्वे स्थानके, बसस्टॉप, रस्त्यांवरील प्रमुख ठिकाणी ऑटोरिक्षा, टॅक्सीचालकांनी भाडे नाकारल्यास तक्रार करण्याबाबत हेल्पलाइन अथवा व्हॉट्सॲप क्रमांकांची यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी संघटनेचे विश्वस्त निकोलस आल्मेडा आणि ॲड. गॉडफ्रे पिमेंटा यांनी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in