मुंबई : कॉर्डेलिया क्रुर्इझ ड्रग प्रकरणामुळे चर्चेत असलेले, अमली पदार्थ विरोधी विभागाचे माजी सहसंचालक समीर वानखेडे यांनी अंधेरीच्या आंबोली पोलीस ठाण्यात आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांच्यावर कारवार्इ करा अशी तक्रार नोंदवली आहे. केतन तिरोडकर यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना खोटे आरोप केले असून न्यायप्रविष्ठ प्रकरणावर भाष्य केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवार्इ करा अशी मागणी आपल्या तक्रारीत वानखेडे यांनी केली आहे.
समीर वानखेडे यांनी पोलीस तक्रार करतांना एक पत्र दिले असून त्या केतन तिरोडकर यांनी कॉर्डिलिया क्रुर्इझ प्रकरणावर एक व्हिडिओ अपलोड केला असून तो बदनामीकारक असल्याचे म्हटले आहे. तिरोडकर यांनी खोटा आणि बदनामीकारक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे असा दावाही वानखेडे यांनी केला आहे. यावर आंबोली पोलीसांनी पत्राच्या आधारे या प्रकरणाचा तपास करण्यात येर्इल असे सांगितले आहे. याबाबत तिरोडकर यांचे म्हणणे असे आहे की वानखेडे यांनी एका व्यक्तीस ड्रगसह अटक केली होती नंतर त्याला सोडून देण्यात आले. याउलट वानखेडे म्हणतात की तिरोडकर यांनी न्यायप्रविष्ठ प्रकरणावर सत्य पडताळून न पाहाता भाष्य केले आहे. तेव्हा त्यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तिरोडकर यांना आयपीसी कलम ४९९ व ५०० अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजेत असे वानखेडे यांनी पत्रात म्हटले आहे. तत्कालीन एनसीबी सह संचालक समीर वानखेडे यांनी कॉर्डिलिया क्रुर्इझवर धाड टाकून शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला अटक केली होती. त्यानंतर समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चक्क दिल्लीहून पथक मुंबर्इस आले होते. या पथकाने वानखेडे यांच्या विरोधात अहवाल दिला होता. त्याआधारे सीबीआयने वानखेडे यांच्या विरोधात एफआयआर दाखल केले असून सध्या त्यायोगे तपास सुरु आहे. तसेच हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे.