गणेशोत्सवाच्या गर्दीचा फायदा घेत रेल्वेत मोबाईल चोरांचा सुळसुळाट

आठवड्याभरात १६९ मोबाईल चोरीच्या घटनांची नोंद; रेल्वे पोलिसांची माहिती
गणेशोत्सवाच्या गर्दीचा फायदा घेत रेल्वेत मोबाईल चोरांचा सुळसुळाट
ANI

सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत असताना उपनगरीय रेल्वे मार्गावर देखील प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. याच गर्दीचा गैरफायदा घेत रेल्वेमध्ये मोबाईल चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मागील आठवड्याभरात उपनगरीय रेल्वे मार्गावर तसेच मेल एक्सप्रेस गाड्यांमध्ये तब्ब्ल १६९ मोबाईल चोरीला गेल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली आहे.

गणेशोत्सव काळात मेल, एक्स्प्रेस गाड्यांना वाढलेल्या गर्दीचा फायदा घेत चोरांकडून मोबाइल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. प्रवासात गर्दीच्या वेळी चोरांकडून प्रवाशांच्या मोबाइलवरच हात मारला जातो. चार ते पाच जणांच्या टोळक्याकडून प्रवाशाला बोलण्यात किंवा भांडणात गुंतवून प्रवाशाचा मोबाइल लंपास केला जातो. अलीकडेच आठवड्याभरात गणेशोत्सवानिमित्त खरेदीसाठी बाहेर पडणारे, मेल, एक्स्प्रेस गाडय़ांनी बाहेरगावी जाणाऱ्यांबरोबरच कार्यालयीन आणि अन्य कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या प्रवाशांपैकी तब्ब्ल १६९ प्रवाशांचे मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी रेल्वे पोलिसांकडे नोंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, कल्याण, वांद्रे, अंधेरी, बोरीवली, कांदिवली, नालासोपारा, वाशी, वडाळा या गर्दीच्या स्थानकांत सर्वाधिक मोबाईल चोरीच्या घटना घडल्याचे रेलवे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in