टॅलेंट सर्च परीक्षा रविवारी; टी.आय.एम.ई संस्थेने शिष्यवृत्ती केली जाहीर

ऑनलाईन वर्ग अभ्यासासाठी १०० टक्क्यापर्यंत सूट मिळणार आहे
टॅलेंट सर्च परीक्षा रविवारी;  टी.आय.एम.ई संस्थेने शिष्यवृत्ती केली जाहीर

मुंबई : टी.आय.एम.ई संस्थेने शिष्यवृत्ती चाचणी जाहीर केली आहे -टी.आय.एम.ई. कॅट २०२३/२४ च्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी प्रतिभा शोध परीक्षा चाचणी दोन स्लॉट मध्ये घेण्यात येणार आहे. रविवार १० सप्टेंबर रोजी सकाळी १० व संध्याकाळी ६ वाजता होणार असून, परीक्षार्थी कोठून ही परीक्षा देऊ शकणार असून, एक तासाची परीक्षा असेल.

टॅलेंट सर्च परीक्षेत परिमाण वाचक, तार्किक आणि शाब्दिक क्षमता या विषयावर बहुपर्यायी प्रश्न असतील. जे विद्यार्थी १० सप्टेंबरपर्यंत नोंदणी करतील त्यांना फ्लॅट ५ हजार रुपये कोर्स फीवर सवलत असेल व ऑनलाईन वर्ग अभ्यासासाठी १०० टक्क्यापर्यंत सूट मिळणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in