कोस्टल रोडच्या बोगद्यात आता बिनधास्त बोला! इंटरनेट सेवा लवकरच कार्यान्वित

कोस्टल रोड प्रकल्पात ७० मीटर जमिनीखाली बोगद्यात आता मोबाइलवर बिनधास्त बोलता येणार आहे
कोस्टल रोडच्या बोगद्यात आता बिनधास्त बोला! इंटरनेट सेवा लवकरच कार्यान्वित

मुंबई : कोस्टल रोड प्रकल्पात ७० मीटर जमिनीखाली बोगद्यात आता मोबाइलवर बिनधास्त बोलता येणार आहे. हँगिंग गार्डन येथे ७० मीटर आणि पुढे २० मीटर जमिनीखाली प्रवास करताना नेटवर्कचा प्रॉब्लेम येऊ, नये, यासाठी खासगी कंपनीच्या माध्यमातून इंटरनेट सेवा कार्यान्वित करण्यात येत आहे. कोस्टल रोड प्रकल्पात बोगद्यातून सफर करताना वाहनधारकांना मोबाईलवर बिनधास्त बोलता येणार आहे. २० मेपर्यंत दोन्ही बोगद्यात इंटरनेट सेवा कार्यान्वित करण्याचे नियोजन असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ऑक्टोबर २०१८ पासून कोस्टल रोड प्रकल्पाचे काम सुरू झाले. कोस्टल रोड प्रकल्पात एकूण १०.५८ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचे बांधकाम प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे- वरळी सी लिंक) च्या दक्षिण टोकापर्यंत करण्यात येत आहे. कोस्टल रोड प्रकल्पात दोन बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. चार मजली इमारतीची उंची असणाऱ्या ‘मावळा’ टनेल बोअरिंग मशिनने २.०७२ किलोमीटरचे हे बोगदे खोदण्यात आले आहेत. यातील पहिला बोगदा खोदण्याचा टप्पा १० जानेवारी २०२२ रोजी पूर्ण झाला आहे. तर दुसऱ्या बोगद्याचे काम ९ एप्रिल २०२२ मध्ये सुरू झाले आणि दुसऱ्या बोगद्याचे काम ‘मावळा’ ने ३० मे २०२३ रोजी फत्ते केले.

हँगिंग गार्डन येथून सुरू होणारा हा बोगदा ७० मीटर जमिनीखाली असून पुढे २० मीटर जमिनीखाली आहे. यात वरळी ते मरीन ड्राईव्हदरम्यान दक्षिण मुंबईकडे जाणारा मार्ग ११ मार्चपासून अंशत: वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र बोगद्यातून प्रवास करताना मोबाईलची रेंज मिळत नसल्याचे पालिकेच्या लक्षात आले आणि दोन्ही बोगद्यात खासगी कंपनीच्या माध्यमातून इंटरनेट सेवा कार्यान्वित करण्यात येत आहे. पुढील २० मेपर्यंत इंटरनेट सेवा कार्यान्वित होणार असून बोगद्यात मोबाईलवर बिनधास्त बोलता येणार आहे.

असा साकारतोय कोस्टल रोड

  • रस्त्याची लांबी - १०.५८ कि.मी.

  • मार्गिका संख्या - ८ (४+४), (बोगद्यांमध्ये ३+३)

  • भराव टाकून बनविलेल्या रस्त्यांची लांबी – ४.३५ कि.मी.

  • पुलांची एकूण लांबी – २.१९ कि.मी.

  • बोगदे – दुहेरी बोगद्यांची लांबी - प्रत्येकी २.०७ कि.मी., ११ मीटर अंतर्गत व्यास (प्रत्येकी ३ वाहनमार्गिका)

  • भारतात प्रथमच सकार्डो वायुविजन प्रणालीची व्यवस्था आपत्कालीन उपाययोजना म्हणून प्रत्येक ३०० मीटरवर ११ छेद

  • उपयोगिता सेवेसाठी बोगद्यामध्ये युटीलिटी बॉक्स -

  • भूमिगत वाहनतळ - ०४, एकूण वाहनसंख्या – १८५६

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in