मराठा सर्वेक्षणात तमिळ सफाई कामगार; मराठी येत नसल्याने सर्वेक्षण कसे करायचे?

ना मराठी येत ना, मराठी लिहिता येत तर सर्वेक्षण कोणत्या आधारे करणार, असा सवाल तमिळ कामगारांनी उपस्थित केला आहे.
मराठा सर्वेक्षणात तमिळ सफाई कामगार; मराठी येत नसल्याने सर्वेक्षण कसे करायचे?

मुंबई : मुंबईत मंगळवारपासून सुरू झालेल्या मराठा व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणात चक्क अशिक्षित तमिळ सफाई कामगारांना जुंपले आहे. ना मराठी येत ना, मराठी लिहिता येत तर सर्वेक्षण कोणत्या आधारे करणार, असा सवाल तमिळ कामगारांनी उपस्थित केला आहे.

मराठा व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणात आधी अभियंता, त्यानंतर आरोग्य सेविकांना जुंपण्यात आले. आता तर चक्क सफाई कामगारांवर सर्वेक्षणाचे काम सोपवण्यात आले आहे. मराठा व खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणात १२३ प्रश्न विचारणे परिपत्रकात नमूद केले आहे. यात निवासी पत्ता, नोकरी कुठे करता, घरी कोण असते, मुलींनी अर्धवट शिक्षण का सोडले, शिक्षण कुठे घेतले, घरातील सदस्य विवाहित, अविवाहित, घरात महिला, पुरुष व तृतीयपंथ किती, कुटुंबातील सदस्याचे मानसिक आरोग्य बिघडले असल्यास आरोग्य सेवा मिळते का, सदस्याला कावीळ झाल्यास कोणाकडे उपचारासाठी घेऊन जाता, घरातील महिला सदस्यांचे बाळंतपण कुठे झाले असे विविध प्रश्न सर्वेक्षणात विचारणे असे परिपत्रकात नमूद केले आहे.

देशहितासाठी सर्वेक्षणात पालिका कर्मचाऱ्यांना समावून घेणे चांगली गोष्ट आहे. परंतु ज्या सफाई कामगारांना लिहिता-वाचता येत नाही, तर सर्वेक्षण कसे करणार, असा सवाल महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियनचे सरचिटणीस मिलिंद रानडे यांनी उपस्थित केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in