ताडदेवचा राजा गणेशोत्सव मंडळाचा अवयवदानाचा उपक्रम; वर्गणीतून करतायेत रुग्णसेवा

धार्मिक उत्सवाला सामाजिक कार्याची जोड देण्याचे काम ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ करत आहे. याच प्रयत्नातून अवयवदानाविषयी जनजागृती करण्याचे कार्य मंडळातर्फे हाती घेतले आहे. 'अवयवदान करून आपण एका व्यक्तीला तरी नवे आयुष्य देऊ या...' हा ताडदेवचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा संकल्प आहे.
ताडदेवचा राजा गणेशोत्सव मंडळाचा अवयवदानाचा उपक्रम; वर्गणीतून करतायेत रुग्णसेवा
Published on

पूनम पोळ/मुंबई

धार्मिक उत्सवाला सामाजिक कार्याची जोड देण्याचे काम ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ करत आहे. याच प्रयत्नातून अवयवदानाविषयी जनजागृती करण्याचे कार्य मंडळातर्फे हाती घेतले आहे. 'अवयवदान करून आपण एका व्यक्तीला तरी नवे आयुष्य देऊ या...' हा ताडदेवचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा संकल्प आहे. आरोग्यसेवेतून लोकसेवा हे व्रत घेऊन गेली ८६ वर्षे हे मंडळ आपली परंपरा जपत आहे. यंदा अवयवदानाविषयी जागृती करण्याचे मंडळाने ठरवले आहे. त्याशिवाय अवयदान करण्याचे अर्ज भरून या कार्याचा श्रीगणेशाही मंडळाचे कार्यकर्ते स्वतःपासून करणार आहेत. तसेच गणेशोत्सवादरम्यान आलेल्या वर्गणीतूनही रुग्णांना मदत केली जात आहे.

ताडदेवचा राजा गणेशोत्सव मंडळाचा अवयवदानाचा उपक्रम; वर्गणीतून करतायेत रुग्णसेवा
नवशक्ति-FPJ इको गणेश: पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे फोटो शेअर करा आणि जिंका मोठी बक्षिसे

मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्णालयात दाखल होणारे अनेक गरजू रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक छोट्याशा का होईना मदतीची वाट पाहत असतात. तर कित्येक रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयात सरकारी योजना आणि उपचार याबद्दलची माहिती नसते. पदराला जोडून ठेवलेला एक एक रुपया ते यावेळेस वापरत असतात. वेळप्रसंगी त्यांना मदत मिळावी यासाठी कोविड काळापासून ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ झटत आहे.

कॅन्सर रुग्णांवर उपचार करण्यासाठी आणि आजूबाजूच्या परिसरातील रुग्णांना मोफत डायलिसिस सेंटर उपलब्ध करून देण्यासाठी मंडळाचे आणि मुख्यमंत्री सहाय्यता कार्यालयाशी चर्चा सुरू असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश माणगावकर यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in