राणी बागेत लुटा पिझ्झाचा आस्वाद; खानपानासाठी उभारले झू विले उपाहारगृह

महाराष्ट्रियन, साऊथ इंडियन तसेच कॉन्टिनेन्टल फूड या ठिकाणी पुरविण्यात येणार आहे.
राणी बागेत लुटा पिझ्झाचा आस्वाद; खानपानासाठी उभारले झू विले उपाहारगृह

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात येणाऱ्या पर्यटकांना पशूपक्ष्यांची धमाल मस्ती अनुभवता येते. आता राणी बागेत येणाऱ्या पर्यटकांना प्राणी-पक्ष्यांची धमाल मस्ती अनुभवल्यानंतर ज्यूस, पिझ्झा, केक अशा विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. १०० लोकांना एकाच वेळी बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून, ६० टेबल असणार आहेत. प्राणिसंग्रहालयातील ‘झू विले’ उपाहारगृहाचे उद्‌घाटन पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्रियन, साऊथ इंडियन तसेच कॉन्टिनेन्टल फूड या ठिकाणी पुरविण्यात येणार आहे. लहान मुलांना आवडेल अशा स्वरूपाच्या खाद्य पदार्थांची व्यवस्थाही या ठिकाणी करण्यात आली आहे. त्यामुळे बच्चे कंपनीसह मोठ्या व्यक्तींनाही खाण्याची सुविधा या ठिकाणी मिळेल, अशी माहिती जिजामाता उद्यानातील अधिकारी अभिषेक साटम यांनी दिली. लहान मुलांना आवडणाऱ्या पिझ्झा, केक, आईस्क्रीम आणि ज्यूस अशी सर्व व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. तब्बल १०० लोकांना एकाच वेळी या कँटीनमध्ये बसून खानपान सेवा वापरता येईल. त्यासाठी ६० टेबलची व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. प्राणिसंग्रहालयात फेरफटका मारल्यावर पेटपूजाही करता येणार आहे. त्यामुळे हा आनंद लुटण्यासाठी येथील नव्या उपाहारगृहात एकाच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणांच्या लज्जतदार पदार्थांचा आस्वाद घ्यायला मिळेल.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in