टाटा मोटर्सच्या तिहामी नफ्यात दुप्पट वाढ

टाटा मोटर्सच्या तिहामी नफ्यात दुप्पट वाढ

डिसेंबर २०२३ मध्ये समाप्त आर्थिक तिमाहीत टाटा मोटर्सचा कंपनीच्या नपफ्यात सुमारे दोन पट वाढ झाली.

मुंबई : डिसेंबर २०२३ मध्ये समाप्त आर्थिक तिमाहीत टाटा मोटर्सचा कंपनीच्या नपफ्यात सुमारे दोन पट वाढ झाली. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा ७०२५ कोटी रुपये राहिला आहे. मागील वर्षी याच कालावधीत २,९५७.७१ कोटी रुपये नफा होता. भारतातील प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांच्या प्रचंड मागणीमुळे कंपनीच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. एनएसईवर २ फेब्रुवारी रोजी कंपनीचे शेअर्स ८७८.७५ रुपयांवर बंद झाले.

टाटा मोटर्सने एक्स्चेंज फाइलिंगमध्ये सांगितले की, डिसेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल २४.९ टक्क्यांनी वाढून १,१०,५५७ कोटी रुपये झाल. तर गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा ८८.४८९ कोटी रुपये होता. कंपनीचा नफा अंदाजापेक्षा चांगला झाला आहे.

सात ब्रोकरेज कंपन्यांच्या तज्ज्ञांनी डिसेंबर तिमाहीत कंपनीचा नफा ४५४७ कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. ब्रोकरेज कंपन्यांच्या मते, महसूल २२ टक्के वाढून १,१०,१६९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा होती. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत, कंपनीचा करपूर्व नफा वार्षिक ४२.५ टक्के वाढून १५४१८ कोटी रुपये झाला. तर ऑपरेटिंग मार्जिन १.७१ टक्के वाढून १३.९४ टक्के झाला. या कालावधीत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात टाटा मोटर्सची एकूण वाहन विक्री २३४९८१ झाली.

logo
marathi.freepressjournal.in