Tata Mumbai Marathon 2023 : कडाक्याच्या थंडीतही मुंबई मॅरेथॉन स्पर्धेला तुफान प्रतिसाद; हजारोंवर स्पर्धकांनी घेतला सहभाग

जगातील सर्वात मोठी मॅरेथॉन म्हणून मुंबई मॅरेथॉनकडे (Tata Mumbai Marathon 2023) पाहिले जाते, यावेळी या स्पर्धेमध्ये तब्बल ५० हजाराहून स्पर्धक सहभागी झाले
Tata Mumbai Marathon 2023 : कडाक्याच्या थंडीतही मुंबई मॅरेथॉन स्पर्धेला तुफान प्रतिसाद; हजारोंवर स्पर्धकांनी घेतला सहभाग

आज मुंबईमध्ये 'मुंबई मॅरेथॉन'निमित्त पुन्हा एकदा मुंबई स्पिरिटची अनुभुती झाली. (Tata Mumbai Marathon 2023) कडाक्याच्या थंडीतही मुंबई मॅरेथॉनमध्ये तब्बल ५५ हजाराहून अधिक लोकांनी सहभाग घेतला होता. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून मुंबई मॅरेथॉनला सुरुवात झाली. यावेळी स्पर्धेचा ब्रँड अ‍ॅम्बेसिडर अभिनेता टायगर श्रॉफदेखील उपस्थित होता. मुंबई मॅरेथॉनचे हे यंदाचे १८ वे वर्ष असून गेली २ वर्ष कोरोना निर्बंधांमुळे ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. टाटा मुंबई एलिट फुल मॅरेथॉन पुरुष गट विजेत्यांमध्ये इथोपियाचा धावपटू हायले लेमी याने बाजी मारली. तर, एलिट भारतीय विजेता गोपी थॉनक्कल ठरला. तसेच, भारतीय महिलांच्या पूर्ण मॅरेथॉन गटामध्ये चावी यादव हिने बाजी मारली.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, "मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत मोठा उत्साह आणि ऊर्जा दिसली. आपली ही मॅरेथॉन जगातील सर्वात मोठी मरेथॉन आहे. २५० अधिक सामाजिक संस्थांचा सहभाग नोंदवला असून तरुण, वृद्ध, दिव्यांग सर्वांचा सहभाग आहे. तसेच जगभरातील धावपटू सहभागी झाले. ५५ हजारहुन अधिक स्पर्धक सहभागी झाले असून पोलीस, प्रशासनाकडून उत्तम व्यवस्था झाली आहे," असे सांगत त्यांनी मुंबई पोलीस आणि सामाजिक संस्थांचे कौतुक केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in