टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक कारला आग ,इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षेबद्दल पुन्हा वाद

नेक्सॉन इलेक्ट्रिक कारचला लागलेल्या आगीच्या घटनेचा व्हिडिओ मंगळवारी सोशल मीडियावर शेअर करण्यात आला
टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक कारला आग ,इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षेबद्दल पुन्हा वाद
Published on

टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक कारला मंगळवारी मुंबईत आग लागली. त्यामुळे भारतात विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षेबद्दल पुन्हा एकदा वाद सुरू झाला. नेक्सॉन इलेक्ट्रिक कारचला लागलेल्या आगीच्या घटनेचा व्हिडिओ मंगळवारी सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये पांढऱ्या रंगाची टाटा नेक्सॉन ईव्ही मुंबईच्या पश्चिमकडे वसई परिसरातील एका रेस्टॉरंटच्या बाहेर आगीत जळताना दिसत आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवानही आग विझवण्याचा आणि परिसरातील वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. टाटा मोटर्सने बुधवारी एक निवेदन जारी करून नेक्सॉन ईव्ही आगीच्या कारणाचा सविस्तर तपास करण्याचे आश्वासन दिले. कंपनीने निवदेनात म्हटले आहे की, चार वर्षांत ३० हजार ईव्हीची विक्री केल्यानंतर १ दशलक्ष किलोमीटरहून अधिक विजेवरील वाहनांनी प्रवास केला असताना अशा प्रकारची पहिली घटना समोर आली आहे. "नुकत्याच लागलेल्या आगीच्या घटनेची सत्यता पडताळून पाहण्यासाठी सविस्तर तपास केला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in