मुंबईमध्ये विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी टाटा पॉवर सज्ज

मुंबईमध्ये विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी टाटा पॉवर सज्ज

कंपनीला अपेक्षा आहे की, एप्रिल-जून २०२४ या कालावधीत मुंबईच्या ग्राहकांची विजेची मागणी १०३० मेगावाॅटपर्यंत पोहोचेल.

मुंबई : मुंबईमध्ये ७.५ लाखांपेक्षा जास्त ग्राहकांना वीज पुरवठा करणाऱ्या टाटा पॉवरने उन्हाळ्यात विजेच्या मागणीमध्ये होत असलेल्या वाढीच्या व्यवस्थापनासाठी संपूर्ण तयारी केली आहे. मुंबईकरांना उन्हाळ्यात अखंडित वीज मिळत राहावी यासाठी टाटा पॉवरने जनरेशन, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशनमध्ये सर्वसमावेशक उपाययोजना केल्या आहेत. विजेच्या मागणीत होत असलेल्या वाढीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि अनुमान लावण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग टूल्स तैनात करण्यात आली आहेत. कंपनीला अपेक्षा आहे की, एप्रिल-जून २०२४ या कालावधीत मुंबईच्या ग्राहकांची विजेची मागणी १०३० मेगावाॅटपर्यंत पोहोचेल.

जनरेशनमध्ये कंपनीने थर्मल आणि हायड्रोइलेक्ट्रिक प्लांट्समध्ये प्रतिबंधात्मक देखरेख पूर्ण केली आहे आणि या कालावधीत कोणतेही मोठे बिघाड होणार नाहीत याची खातरजमा केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in