

मुंबई : वाहतुकीचे नियम मोडून ड्रायव्हिंग केल्याने जाब विचारल्याच्या रागातून पोलिसाला शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या पाच टॅक्सीचालकांची निर्दोष सुटका झाली. सरकारी पक्ष आरोपी टॅक्सीचालकांविरुद्ध सबळ पुरावे सादर करण्यात अपयशी ठरला. पोलिस आणि सरकारी पक्षाच्या याच अपयशावर बोट ठेवत अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. पी. त्रिभुवन यांनी टॅक्सीचालकांना दोषमुक्त केले. इब्राहिम शेख, असिफ शेख, शहबाद खान, अडसर शेख, बुराहुद्दीन शेख अशी आरोपींची नावे आहेत.
तक्रारदार पोलीस नाईक ज्ञानेश्वर मेश्राम हे १४ जानेवारी २०१९ रोजी दुपारी ३.०० वाजता माहीम वाहतूक विभागात कर्तव्य बजावत असताना हा प्रकार घडला. मेश्राम यांनी एका टॅक्सीचालकाला नियम मोडल्याबद्दल रोखण्याचा प्रयत्न केला असता टॅक्सीचालकाने त्यांचे म्हणणे ऐकले नाही आणि भांडण केले. मेश्राम यांना शिवीगाळ आणि मारहाण केली होती.