जेजे रुग्णालयातून टीबीच्या आरोपीचे पलायन

मारुतीविरुद्ध भांगूरनगर पोलीस ठाण्यात अनैसर्गिक लैगिंक अत्याचारासह विनयभंग आणि पोक्सोच्या एका गुन्ह्याची नोंद आहे.
जेजे रुग्णालयातून टीबीच्या आरोपीचे पलायन

मुंबई : जे. जे. रुग्णालयातून मारुती विजय शिंदे या ४५ वर्षांच्या टीबीच्या आरोपीने पलायन केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. त्याच्याविरुद्ध जे. जे. मार्ग पोलिसांनी कायदेशीर रखवालीतून पलायन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.

कुंडलिक रामचंद्र काकडे हे भांगुरनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील आरोपी मारुती शिंदे याच्या गार्ड ड्युटीवर होते. मारुतीविरुद्ध भांगूरनगर पोलीस ठाण्यात अनैसर्गिक लैगिंक अत्याचारासह विनयभंग आणि पोक्सोच्या एका गुन्ह्याची नोंद आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या ठाणे कारागृहात होता. त्याला टीबी झाला होता. त्यामुळे त्याला २८ डिसेंबर २०२३ पासून जे. जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मंगळवारी रात्री पाऊणच्या सुमारास ते वॉर्ड क्रमांक ३४ मध्ये गेले होते. यावेळी त्यांना मारुती शिंदे नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in