फुकट्या प्रवाशांवर टीसीची विक्रमी कारवाई, वर्षभरात एक कोटींहून अधिक दंड वसूल

विना तिकीट अंतरापेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेने विशेष मोहीम हाती घेतली आहे.
फुकट्या प्रवाशांवर टीसीची विक्रमी कारवाई, वर्षभरात एक कोटींहून अधिक दंड वसूल

मुंबई : विना तिकीट अंतरापेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमे अंतर्गत लोकल, मेल एक्स्प्रेस मध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या १०,६८६ प्रवाशांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारत एक कोटींहून अधिक दंड वसूल केला आहे.‌ चांद यांनी २०२१ मध्ये १.२५ कोटींचा दंड वसूल केला होता, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

विना तिकीट अंतरापेक्षा जास्त प्रवास कायद्याने गुन्हा असून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मध्य रेल्वेकडून वारंवार देण्यात येतो. तरीही विना तिकीट प्रवास करणाऱ्यांचा बोलबाला आहे. अशा विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. तिकीट तपासणी करणाऱ्या टीसीच्या निवडक गटात मुंबई विभागाचा समावेश होता. २०२३ - २४ या आर्थिक वर्षात १०,४२८ प्रकरणांमधून १,००,०२,८३०/- च्या उत्पन्नासह सुनील नैनानी मुख्य तिकीट निरीक्षक आणि एम एम शिंदे, मुख्य तिकीट निरीक्षक यांनी ११,३६७ प्रकरणांमधून रु. १,०१,३२,८७०/- च्या महसूल प्राप्त केला आहे.

या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी इतर टीसीसमोर एक आदर्श ठेवला आहे. मुंबई विभागातील या तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांचे अनुपालन सुनिश्चित केले असून आणि महसूल निर्मितीसाठी केलेले प्रयत्न कौतुकास पात्र आहे. या मेहनती व्यक्तींचे सामूहिक प्रयत्न तिकीट तपासणी कार्याप्रती आपली बांधिलकी आणि कार्यक्षमता प्रतिबिंबित करतात.

logo
marathi.freepressjournal.in