बांगलादेशातील विद्युतनिर्मिती केंद्रासाठी भारतीय कंपनीचे तांत्रिक सहाय्य

भारत सरकारच्या मालकीची कंपनी असलेल्या नॅशनल थर्म पॉवर कॉर्प व बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्ड यांच्यातील जॉइंट व्हेंचर आहे
बांगलादेशातील विद्युतनिर्मिती केंद्रासाठी भारतीय कंपनीचे तांत्रिक सहाय्य

जीआरपी व एफआरपीवर आधारित पाइपची निर्मिती करणाऱ्या, भारतातील प्रीमिअर औद्योगिक पाइपिंग सोल्यूशन्स कंपनी असलेल्या केमिकल प्रोसेस पाइपिंग (सीपीपी) कंपनीतर्फे बांगलादेश इंडिया फ्रेंडशिप पॉवर कंपनी एफजीडी प्लांटमध्ये एफआरपी स्टॅक राबविण्याची घोषणा केली आहे.

बीआयएफपीसीएल ही भारत सरकारच्या मालकीची कंपनी असलेल्या नॅशनल थर्म पॉवर कॉर्प व बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्ड यांच्यातील जॉइंट व्हेंचर आहे. सध्या सुरू असलेल्या स्थानिक व आंतरराष्ट्रीय प्रकल्पांसह २०२४ पर्यंत ३०० कोटींची वार्षिक उलाढाल करण्याचे सीपीपीचे लक्ष्य आहे. कंपनीने भेल आणि बांगलादेशमधील सिम्प्लेक्ससोबत या मैत्री सुपर थर्मल पॉवर प्लांट प्रकल्पाचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. बांगलादेशमधील रामपाल येथे १,३२० मेगवॅटच्या कोळशावर आधारित विद्युतनिर्मिती केंद्रासाठी ८०० फुटांचा एफआरपी स्टॅक उभारण्याची कामगिरी साध्य करणारी केमिकल प्रोसेस पाइपिंग ही पहिली कंपनी आहे. १९ जुलै रोजी दिल्लीत आयोजित ६ व्या फ्लू गॅस डिसल्फरायझेशन परिषदेत कंपनीने अहवालाचे अनावरण केले. या अहवालात एफजीडी कारखान्यांसाठी एफआरपी स्टॅक्सचा उपयोग आणि काँक्रिट स्टॅक्समध्ये पारंपरिक धातूच्या लायनर्सना एफआरपी हा कमी खर्चिक व टिकाऊ पर्याय कसा आहे यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in