
मुंबई : मुंबई बँक संचालकपदी तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती केल्याने त्या भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेला उधाण होते. मात्र आपण शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेनेनेबरोबर कायम असल्याचे सांगत पक्षांतराला फुलस्टॉप दिला.
मुंबै बँकेच्या संचालकपदी तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना भाजप आपल्या पक्षात घेण्यासाठी पावले टाकत असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र या सर्व चर्चा फेटाळून लावत, घोसाळकर यांनी पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या पदांचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नाराज असलेल्या तेजस्वी यांना मातोश्रीवर बोलावून ठाकरे यांनी समजूत काढली. त्यानंतर त्यांचे सासरे विनोद घोसाळकर यांनी तेजस्वी आणि मी उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर चार दिवसांपूर्वी मातोश्रीवर झालेल्या माजी नगरसेवकांच्या बैठकीला त्यांनी हजेरी लावली होती. मात्र, शुक्रवारी मुंबई बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर तेजस्वी या पक्ष सोडणार, अशी चर्चा होती.