उष्माघाताचा ताप, आता दोन महिने तब्येत सांभाळा

गेल्या काही वर्षांत जगभरातील तापमानात बदल जाणवू लागला आहे. उष्माघाताचे आजार वाढले आहे. उष्माघात हा एक प्रकारे गंभीर आजार आहे. शरीराचे तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक वाढले तर ते सूर्याच्या गरमीपुढे सामान्य पातळी ठेवणे अशक्य होते.
उष्माघाताचा ताप, आता दोन महिने तब्येत सांभाळा

मुंबई : होळीनंतर तापमानात वाढ झाली असून, राज्यात पारा ४२ ते ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. उष्माघातामुळे अनेकांच्या जीवावर बेतले आहे. त्यामुळे पालिकेच्या केईएम, नायर, सायन, कुपर रुग्णालयात कोल्ड रुम अक्टीव्ह केले असून कोल्ड रूममध्ये एसी, कुलर व वॉर्डात दोन बेड्स राखीव ठेवण्यात आले आहेत.

उष्माघातामुळे बाधित होणाऱ्या रुग्णांवर वेळीच उपचार करणे शक्य व्हावे यासाठी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयासह आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे रुग्णालयात रुग्णांसाठी थंड पाणी, रोजच्या तापमानाची नोंद घेण्यात येणार आहे.

गेल्या काही वर्षांत जगभरातील तापमानात बदल जाणवू लागला आहे. उष्माघाताचे आजार वाढले आहे. उष्माघात हा एक प्रकारे गंभीर आजार आहे. शरीराचे तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक वाढले तर ते सूर्याच्या गरमीपुढे सामान्य पातळी ठेवणे अशक्य होते. त्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचे समोर येते. त्यामुळे राज्यात उष्णता विकार प्रतिबंध व नियंत्रणासाठी राज्यात विविध पातळीवर दरवर्षी १ मार्च ते ३१ जुलै या कालावधीत उपाययोजना करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येतो. मुंबईत ही गेल्या काही वर्षांत तापमानात प्रचंड वाढ होत असून, राज्यात तर पारा ४२ ते ४४ अंश सेल्सिअसच्या घरात जातो. त्यामुळे राज्य सरकारची यंत्रणा सज्ज झाली असून, राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका व महापालिकांना योग्य त्या उपाययोजना करण्याची मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत.

या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने कडक उन्हाळ्यात काय काळजी घ्यावी, कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत माहिती जारी केली आहे. मार्च महिन्यापासून महाराष्ट्राच्या अनेक भागात तापमानामध्ये वाढ होते. उष्णतेची लाट ही एक आपत्ती (सायलेंट डिझास्टर) असून, नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन राज्य सरकार व मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

बचाव करण्यासाठी 'हे' करा

  • पुरेसे पाणी प्या. प्रवासात पाणी सोबत ठेवा.

  • उन्हात जाताना टोपीखाली ओलसर कपडा ठेवा.

  • पाळीव प्राण्यांना सावलीत थंड ठिकाणी ठेवा.

  • ओलसर पडदे, पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा.

करू नका

  • शक्यतो उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळा.

  • कष्टाची कामे उन्हात करू नका.

  • पाक केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नका.

  • गडद रंगाचे तंग कपडे वापरू नका.

  • उन्हाच्या काळात स्वयंपाक करणे टाळा. स्वयंपाक घर हवेशीर ठेवा.

  • मद्य. चहा कॉफी. सॉफ्ट ड्रिंक्स टाळा.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in