दसरा मेळाव्यात ठरणार ठाकरे-शिंदेचा जनाधार

आपली शिवसेना खरी, आपल्यालाच जनतेचा व शिवसैनिकांचा पाठिंबा आहे,असा दावा ठाकरे व शिंदे गट करीत आहे
दसरा मेळाव्यात ठरणार ठाकरे-शिंदेचा जनाधार

यंदाचा दसरा महाराष्ट्रासाठी राजकीयदृष्ट्या दिशादर्शक ठरणार आहे. मराठी मातीत रुजलेल्या शिवसेनेचे भविष्यही यानिमित्ताने निश्चित होणार आहे. दसरा मेळावा व शिवसैनिक यांच्यातील नातेबंध खूप जुना आहे. शिवसेनेची परंपरा असलेल्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुखांकडून राजकीय ध्येय-धोरणांची दिशा स्पष्ट करण्यात येते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ही परंपरा पुढे नेली. मात्र, यावर्षी शिवसेनेतील बंडानंतर दोन मेळावे होत आहेत. त्यामुळे खरी शिवसेना कोणती याची पहिली झलक यंदाच्या दसरा मेळाव्यातून स्पष्ट होणार आहे. शिवसैनिक व महाराष्ट्रातील जनतेचे काय मत आहे, जनाधार कुणाला मिळणार ठाकरेंना की शिंदेना याची पहिली परीक्षा दसरा मेळाव्यात पार पडणार आहे.

आपली शिवसेना खरी, आपल्यालाच जनतेचा व शिवसैनिकांचा पाठिंबा आहे,असा दावा ठाकरे व शिंदे गट करीत आहे. यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. अधिकाधिक गर्दी आपल्याच मेळाव्याला व्हावी यासाठी प्रयत्नांची शिकस्त करण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेनेवरील ताब्यासाठी

शिवसेनेसाठी ‘राष्ट्रवादी’ची बॅनरबाजी

एकीकडे भाजपने शिंदे सेनेच्या दसरा मेळाव्यापासून दूर राहणे पसंत केले असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी ठिकठिकाणी बॅनरबाजी केली आहे. त्यामुळे या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हजेरी लावू शकतात. महाविकास आघाडी सरकार पडल्यापासून काँग्रेस शिवसेनेपासून चार हात फटकून वागत आहे. मात्र, राष्ट्रवादीने पूर्वीपासून शिवसेनेची जोरदार पाठराखण केली असून आता दसरा मेळाव्यातही ते दिसून येत आहे.

दसरा मेळाव्यात मर्यादा

मर्यादा ओलांडू नका!

शिंदे व ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याबाबत शरद पवार म्हणाले की, खरे तर हे दुर्दैवी आहे. एका पक्षाचे दोन भाग झाले आहेत आणि खरा पक्ष कोणता यावरून त्यांच्यामध्ये स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेच्या निकालाची सुत्रे एकप्रकारे दसरा मेळाव्याच्या माध्यमातून स्वीकारली गेली आहेत. राजकारणात अशा गोष्टी होत असतात. असा संघर्ष काही नवा नाही. पण या संघर्षालाही एक मर्यादा ठेवली पाहिजे. मर्यादा ओलांडून काही होत असेल तर राज्याच्या दृष्टीने ते चांगले नाही. याची सर्वाधिक जबाबदारी ही राज्यप्रमुखावर असते, असा इशाराही त्यांनी दिला.

logo
marathi.freepressjournal.in