मुंबईतील कडवट शिवसैनिक म्हणून सर्वत्रव परिचित असलेले ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख सुधीर सयाची मोरे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज (१ सप्टेंबर) रोजी घाटकोपर येथील रेल्वेरुळावर त्यांचा मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. एका वृत्तावाहिनीने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री एका कामानिमित्ताने घराबाहेर पडलेल्या सुधीर मोरे यांनी घाटकोपर ते विद्याविहार रेल्वेस्थानक दरम्यानच्या रुळावर झोपून आत्महत्या केली आहे. मोरे यांना काही लोकांकडून ब्लकमेल केलं जात असल्याचं संशय त्यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केला आहे. मात्र, त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यांचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात शविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
सुधीर मोरे यांच्या आत्महत्येवर त्यांच्या निकटवर्तियांनी संशय व्यक्त केला आहे. मोरेंना गेल्या काही महिन्यांपासून कोणीतरी ब्लॅकमेल करत होते. त्यांनी त्यांच्या भावाला आमि निकटवर्तीयांना याबाबत कल्पना दिली होती. तसंच कॉल रेकॉर्ड करण्यासाठी दुसरा फोन देखील मागितला होता. त्यांच्या निकटवर्तियांनी त्यांचे कॉल्स रेकॉर्ड आणि रेकॉर्डिंग तापसून पाहण्याची विनंती पोलिसांना केली आहे.
सुधीर यांनी लोको दोस्त नावाची संघटना स्थापन केली होती. त्यातूनच त्यांचा राजकारणातील प्रवास सुर झाला होता. त्यांनी अरुण गवळी यांच्या पक्षातून सर्वप्रथम निवडणूक लढवली होती. त्या विजयी झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.