Mumbai : 'ठाकरें'च्या मोर्च्याचा मार्ग बदलला; मेट्रो सिनेमा ते पालिका मुख्यालय असा निघेल मोर्चा, पोलिसांच्या विनंतीनुसार घेतला निर्णय

निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकाराने रविवार, ४ ऑक्टोबर रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्च्याचा मार्ग बदलण्यात आला आहे.
Mumbai : 'ठाकरें'च्या मोर्च्याचा मार्ग बदलला; मेट्रो सिनेमा ते पालिका मुख्यालय असा निघेल मोर्चा, पोलिसांच्या विनंतीनुसार घेतला निर्णय
Mumbai : 'ठाकरें'च्या मोर्च्याचा मार्ग बदलला; मेट्रो सिनेमा ते पालिका मुख्यालय असा निघेल मोर्चा, पोलिसांच्या विनंतीनुसार घेतला निर्णयसंग्रहित छायाचित्र
Published on: 

मुंबई : निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकाराने रविवार, ४ ऑक्टोबर रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्च्याचा मार्ग बदलण्यात आला आहे. यापूर्वी ठरवण्यात आलेल्या मार्गाऐवजी आता मेट्रो सिनेमा ते मुंबई महानगरपालिका मुख्यालय असा मोर्च्याचा नवीन मार्ग निश्चित करण्यात आल्याची माहिती शिवसेना नेते अनिल परब आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी शुक्रवारी शिवसेना भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ४ ऑक्टोबर रोजी विराट जनमोर्च्याची हाक दिली आहे. सुरुवातीला हा मोर्चा भायखळा येथील रिचर्डसन अँड क्रुडास कंपनी ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत निघणार होता. परंतु, मुंबई पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने केलेल्या विनंतीचा मान ठेवून मोर्च्याचा मार्ग बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अनिल परब यांनी सांगितले.

त्यानुसार आता हा मोर्चा मेट्रो सिनेमा ते मुंबई महानगरपालिका मुख्यालयापर्यंत जाईल. मात्र मोर्च्याची वेळ सकाळी १० वाजताचीच असून त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मोर्च्याचे रूपांतर जाहीर सभेत होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

सर्वसामान्य मोठ्या संख्येने सहभागी होतील

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते विविध पक्षांच्या नेत्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधत असून निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत, असे परब यांनी सांगितले. दरम्यान, बाळा नांदगावकर यांनी मागील वेळी काढण्यात आलेल्या ‘सत्याचा मोर्चा’ प्रमाणेच हा मोर्चाही निवडणूक प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित करणारा असल्याचे स्पष्ट केले. निवडणूक प्रक्रियेबाबत जनतेमध्ये जागृती निर्माण झाली असून लोक या आंदोलनात सहभागी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in