
मुंबई : येत्या तीन ते चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाच्या तारखा जाहीर होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर मंगळवारी नगरविकास विभागाने प्रभाग रचनेचे आदेश जारी केले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने विशेष रणनिती आखली असून मुंबईतील १२ उपनेत्यांवर विधानसभा निहाय विशेष जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
मातोश्रीवर झालेल्या बैठकीत ठाकरे गटाकडून मुंबई महानगर पालिकेच्या पार्श्वभूमीवर उपनेत्यांवर विधानसभानिहाय जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. मतदार संघात जाऊन आढावा बैठका, माजी नगरसेवक, शाखा प्रमुख इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे निर्देश पक्षाकडून त्यांना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मिनी विधानसभा अशी ओळख असलेल्या मुंबई महापालिकेची निवडणूक सर्वात महत्त्वाची निवडणूक मानली जाते. मागील २५ वर्ष मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे. शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यावर विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा जनाधार घटला.
या उपनेत्यांवर विशेष जबाबदारी :
अमोल कीर्तीकर - दहिसर, बोरिवली, मागाठाणे
उद्धव कदम – चारकोप, कांदिवली, मालाड पश्चिम
विलास पोतनीस - दिंडोशी, गोरेगाव, जोगेश्वरी पूर्व
विश्वासराव नेरूरकर - वर्सोवा, अंधेरी पूर्व व पश्चिम
रवींद्र मिर्लेकर – विलेपार्ले, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम
गुरुनाथ खोत - चांदिवली, कलीना, कुर्ला
नितीन नांदगावकर - विक्रोळी, भांडुप, मुलुंड
सुबोध आचार्य - घाटकोपर - पूर्व व पश्चिम, शिवाजीनगर – मानखुर्द
मनोज जमसूतकर - अनुशक्तीनगर, चेंबूर, सायन कोळीवाडा
अरुण दूधवडकर - धारावी, माहीम, वडाळा
अशोक धात्रक - वरळी, दादर, शिवडी
सचिन अहिर – मलबार हिल, कुलाबा, मुंबादेवी