Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ; लिहिले उपमुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे लिहिले होते पत्र
Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ; लिहिले उपमुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना लिहिले होते. या पत्राची दखल उपमुख्यमंत्र्यांनी घेतली असून संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच, त्यांचा जबाब नोंदविण्यासाठी पोलिसांचे एक पथक नाशिकमध्ये दाखल झाले आहे. संजय राऊतांनी श्रीकांत शिंदेंवर केलेल्या गंभीर आरोपानंतर आता शिंदे आणि ठाकरे गटातील वाद अधिक तीव्र होण्याची चिन्ह आहेत.

ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी देण्यात आली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकूरला ही सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला. या प्रश्नी आपण लक्ष घालावे, असे पत्रही राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले. त्यांच्या या आरोपामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली होती. त्यांच्या पत्राची रितसर दखल घेतली जाईल, सुरक्षेसाठी जी समिती असते ती पुढचा निर्णय घेईल. मात्र राऊत आता इतक्या बिनडोकपणाचे आरोप करत आहेत, की त्यांना उत्तर तरी काय द्यायचे हाच विचार असतो, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in