ठाणे कोर्टाने राहुल गांधींना ठोठावला ५०० रुपयांचा दंड

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव घेतल्याने एका कार्यकर्त्याने राहुल गांधी यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता.
ठाणे कोर्टाने राहुल गांधींना ठोठावला ५०० रुपयांचा दंड

ठाणे : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांना ठाण्यातील कोर्टाने ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव घेतल्याने एका कार्यकर्त्याने राहुल गांधी यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणात लेखी जबाब नोंदवण्यात विलंब केल्यानं गांधी यांना कोर्टाने ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

मानहानीच्या खटल्यात उत्तर दाखल करण्यास उशीर केल्याबद्दल राहुल गांधींना ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येशी आरएसएसचा संबंध जोडणाऱ्या माजी खासदार राहुल गांधी यांच्या कथित वक्तव्याबद्दल आरएसएसचे स्वयंसेवक विवेक चंपानेरकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता.

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या संदर्भात संघाचे (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) नाव जोडल्याबद्दल संघ कार्यकर्त्याने राहुल गांधी यांच्यावर दाखल केलेल्या दिवाणी मानहानीच्या खटल्यात लेखी म्हणणे दाखल करण्यास विलंबबाबतचे आदेश ठाणे येथील न्यायालयाने शुक्रवारी दिले. काँग्रेस खासदाराला ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. राहुल गांधी यांच्याकडून लेखी निवेदन दाखल करण्यात ८८१ दिवसांचा विलंब झाला आणि त्यांचे वकील नारायण अय्यर यांनी या विलंबाची क्षमा मागणारा अर्ज दाखल केला होता.

logo
marathi.freepressjournal.in