मोटरमनच्या सतर्कने अपघात टळला

सुरक्षेसाठी तैनात असलेले रेल्वे कर्मचारी किती दक्ष असतात याचाच प्रत्यय त्यातून आला.
मोटरमनच्या सतर्कने अपघात टळला

मुंबई : पनवेल लोकल मानखुर्द ते वाशीदरम्यान जात असताना रेल्वे मार्गावर लोखंडाचा तुकडा आढळल्याने भीषण दुर्घटना घडणार होती. मात्र, मध्य रेल्वेच्या दक्ष मोटरमनने ही लोखंडी वस्तू दिसताच तत्काळ लोकल थांबवली. त्यामुळे अपघात टळला. त्याचबरोबर मोटरमनने ही घातक वस्तू स्वत:च्या हाताने बाजूला केली. त्यानंतर वाशीला लोकल पोहचल्यावर हा लोखंडाचा तुकडा स्टेशन प्रमुखाच्या हातात दिला. सोमवारी रात्री ८.४४ वाजता ही घटना घडली. प्रवाशांच्या मोटरमनच्या सतर्कने अपघात टळला

सुरक्षेसाठी तैनात असलेले रेल्वे कर्मचारी किती दक्ष असतात याचाच प्रत्यय त्यातून आला. आता हा लोखंडाचा तुकडा कोणी ठेवला याचा तपास सुरू आहे. तसेच भविष्यात अशा घडू नये म्हणून रेल्वेने प्रयत्न सुरू केले आहेत. सूत्रांनी सांगितले की, ज्या भागात हा लोखंडाचा तुकडा सापडला तेथे भिंती बांधलेल्या नाहीत. तसेच या भागात झोपडपट्टी आहे. मध्य रेल्वेच्या आरपीएफने या घटनेची चौकशी सुरू केली. या प्रकरणी रेल्वे कायदा १५३, १४७ नुसार अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेला बाधा पोहचवल्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. जनतेने अतिदक्ष राहून रेल्वे मार्गाच्या जवळ संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवावे, असे आवाहन रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in