पूवैमनस्यातून तरुणावर हल्ला करणाऱ्या आरोपीस अटक

पूवैमनस्यातून त्याच्याशी वाद घालून त्याला लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती.
पूवैमनस्यातून तरुणावर हल्ला करणाऱ्या आरोपीस अटक

मुंबई : पूवैमनस्यातून नफिस अहमद खान (३३) या तरुणावर लाथ्याबुक्यांसह तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला करणाऱ्या वेदप्रकाश प्रेमनाथ चौबे ऊर्फ ललनू चौधरी या आरोपीस जुहू पोलिसांनी अटक केली. गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता, गेल्या पाच महिन्यांपासून त्याच्या मागावर जुहू पोलीस होते, अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. नासीर अहमद बैतुल्ला खान हा गोरेगाव येथे राहत मिडीया शूटींगचे काम करतो. त्याचा नफिस हा मोठा भाऊ आहे. त्याचे त्याच्या पत्नीसोबत पटत नसल्याने ती तिच्या दोन मुलांसोबत नवी मुंबईतील माहेरी निघून गेली होती. त्यामुळे तो कधी नासीरच्या गोरेगाव किंवा कुर्ला येथील त्याच्या आईसोबत राहत होता. त्याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. तिचाच वाढदिवस साजरा करण्यासाठी तो ७ मेला विलेपार्ले येथे गेला होता. यावेळी ललनू चौधरीने पूवैमनस्यातून त्याच्याशी वाद घालून त्याला लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती.

logo
marathi.freepressjournal.in