नोकरीच्या आमिषाने गंडा घालणाऱ्या आरोपीला अटक

फ्लॅटचे आमिष दाखवून चार उमेदवारांची फसवणूक केली
नोकरीच्या आमिषाने गंडा घालणाऱ्या आरोपीला अटक

मुंबई : शासकीय सेवेत कायमस्वरुपी नोकरीसह फ्लॅटचे आमिष दाखवून चार उमेदवारांची फसवणूक केल्याप्रकरणी मनोजभाई छोटालाल पुरबिया ऊर्फ राजू ऊर्फ छोटू भंडारी याला बोरिवली पोलिसांनी अटक केली. मनोजभाई व त्याची पत्नी मिना हिने आतापर्यंत चार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून १९ लाख ६५ हजार रुपये घेतल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांत मीनाला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून, तिचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. यातील तक्रारदार महिला हॉटेल व्यावसायिक असून, तिचे दहिसर आणि बोरिवली परिसरात दोन हॉटेल आहे. ते दोन्ही हॉटेल तिच्यासह तिचे पती सांभाळतात. चार वर्षांपूर्वी तिची मनोजभाईशी ओळख झाली होती. त्याने तिला तो महापालिकेत वरिष्ठ अधिकारी असल्याची बतावणी केली होती. मनपासंबंधी दोन प्रकरणात त्याने तिची मदत केली होती. त्यामुळे तिला त्याच्यावर विश्‍वास बसला होता. याच दरम्यान त्याने तिला शासकीय नोकरी भरतीची माहिती देताना कोणीही इच्छुक असल्यास सांगण्यास सांगितले होते. त्यामुळे तिने तिच्या भाच्यासह इतर तिघांना नोकरी मिळवून देण्याची विनंती केली होती. त्यांना मनोजभाई आणि त्याची पत्नी मिना हिने कालिना महाविद्यालयासह मुंबई महापालिका आणि रेल्वेमध्ये नोकरीचे आमिष दाखविले होते.

logo
marathi.freepressjournal.in