मुंबई : खरेदीचा बहाणा करून कार घेऊन पळून गेलेल्या एका आरोपीला दिडोंशी पोलिसांनी अटक केली. विशाल विलास चाळके असे या आरोपीचे नाव असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. कल्याण येथील तक्रारदाराची मारुती सुझुकी इर्टिगा कार विकायची होती. विशाल चाळकेने ही कार नऊ लाखांमध्ये विकत घेण्याची तयारी दाखविली होती. त्यासाठी त्याने दोन धनादेश देत दोन दिवसांसाठी कार घेऊन जातो, असे सांगून तो कार घेऊन निघून गेला होता. याचदरम्यान आपली कार विशालने परस्पर पुण्यातील तेजस साळुंखे नावाच्या एका व्यक्तीला विक्री केल्याचे समजले. अखेर तक्रारदाराने विशाल चाळकेविरुद्ध दिडोंशी पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी अपहाराचा गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या विशालला दिडोंशी पोलिसांनी अटक केली.