एअर होस्टेसची हत्या करणाऱ्या आरोपीची कोठडीतच आत्महत्या ; पँटच्या सहाय्याने घेतला गळफास

आज सकाळी ६.३० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.
एअर होस्टेसची हत्या करणाऱ्या आरोपीची कोठडीतच आत्महत्या ; पँटच्या सहाय्याने घेतला गळफास

मुंबईतील अंधेरीत एका एअर होस्टेची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली होती. यानंतर तापासाची सूत्रे फिरवत पवई पोलिसांनी एका सफाई कर्मचाऱ्याला याप्रकरणी अटक केली होती. या सफाई कर्मचाऱ्याने देखील आपला गुन्हा कबुल केला होता. आता या प्रकरणात एक धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणातील आरोपी विक्रम अटवाल याने कोठडीतच पँटच्या सहाय्याने गळफास लावत आत्महत्या केली आहे. आज सकाळी ६.३० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. पवईत राहणाऱ्या रुपल आग्रे या तरुणीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी विक्रम अटवाल याला अटक केली होती. यानंतर त्याने कोठडीतच गळफास लावत जीवन संपवलं.

घटना उघडकीस आल्यानंतर आरोपीचा मृतदेह जवळच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आला असून तिथे त्यांचं शवविच्छेदन करण्यात येणार आहे. विक्रम हा एअर होस्टेस राहत होती त्याच इमारतीत हाऊस किपिंगचं काम करत होता. त्याचा दोन दिवसांपूर्वी रुपल सोबत वाद झाला होता. याच वादातून त्याने तिची हत्या केल्याची कबुली दिली. यानंतर त्याला अटक करुन पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज आरोपी विक्रमला न्यायालयात हजर केलं जाणार होतं. परंतु त्याने त्यापूर्वीचं हे धक्कादायक पाऊल उचललं.

नेमकं काय आहे प्रकरण

रविवार(४ सप्टेंबर) रोजी मुंबईत २४ वर्षीय एअर होस्टेस रुपल आग्रेची फ्लॅटमध्ये हत्या करण्यात आली होती. गळा चिरुन रुपलची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर १२ तासांच्या आताचं पोलिसांनी त्याच इमारतीत हाऊस किपिंगचं काम करणाऱ्याला अटक केली होती. हा आरोपी पवईचा रहिवासी होता.

पवई पोलिसांनी या प्रकरणात आरोपी विक्रम अटवाल विरोधात भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला होता. अटक केल्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यानंतर त्याची रवानगी अंधेरी पोलीस स्टेशनमद्ये करण्यात आली होती. याच ठिकाणी त्याने पँटच्या सहाय्याने गळफास घेत आयुष्य संपवलं.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in