मुंबई : गणपतीपुळे येथील सागर किनारी आलेल्या तब्बल ३५ फूट लांब व ४ टन वजनाच्या ब्लू व्हेल माशाला ४० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बुधवारी पुन्हा समुद्रात सोडण्यात यश आले असे वाटले होते. मात्र दुर्दैवाने काही तासांनी त्याच्या प्रकृतीत काही गुंतागुंत निर्माण झाली आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचा मृतदेह पुन्हा सागरकिनाऱ्यावर पडलेला आढळला असल्याची माहिती उप वनाधिकारी गिरिजा देसाई यांनी दिली.
येथील वनाधिकाऱ्यांनी येऊन त्या ब्लू व्हेलच्या पिल्लाच्या मृतदेहाची तपासणी केली तेव्हा तो मरण पावल्याचे आढळून आले मात्र त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे, ते समजू शकमार नाही. त्यासाठी आता गोव्याचे पशुवैद्यकांचे पथक येऊन तपासणी करील आणि त्या पिल्लाच्या मृत्यूचे कारण निश्चित करील, असे देसाई यांनी सांगितले.