मुंबई : 'द बंगाल फाइल्स' हा चित्रपट पूर्वेकडील राज्यात प्रदर्शित होऊ नये म्हणून पश्चिम बंगाल सरकार आणि पोलीस अधिकारी थिएटर मालकांना धमकावित असल्याचा आरोप चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केला आहे. चित्रपटाचे निर्मातही असलेल्या अग्निहोत्री यांनी याबाबत आपण कायदेशीर कारवाई करण्याची तयारी करत असल्याचे म्हटले आहे.
गुरुवारी चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी अग्निहोत्री यांनी सांगितले की, पश्चिम बंगाल सरकार जे काही करत आहे ते बेकायदेशीर आहे. आम्ही रिट याचिका दाखल करण्याची योजना आखत आहोत, परंतु उद्या काय होईल यावर आधारित निर्णय घेऊ.