सर्वोत्तम ७ नागरी केंद्रांना गौरविण्यात येणार; पालिकेची कायाकल्प संकल्पना

सर्व नागरी आरोग्य केंद्रातील अडचणी सोडविण्यात येणार आहेत
 सर्वोत्तम ७ नागरी केंद्रांना गौरविण्यात येणार; पालिकेची कायाकल्प संकल्पना

मुंबईत १३८ नागरी आरोग्य केंद्र आहेत. मात्र अस्वच्छता, अपुऱ्या सुविधा, तुटलेले बेंच यांसारख्या अनेक समस्यांमुळे रुग्ण नागरी आरोग्य केंद्रात जाण्यासाठी धाजावत नाहीत. मात्र आता ही नागरी आरोग्य केंद्र हायजीन होणार असून त्यातील बदलामुळे रुग्णांना या ठिकाणी उपचार घेण्यास जावे वाटेल. हा सर्व बदल कायाकल्पच्या माध्यमातून होणार असून १३८ नागरी आरोग्य केंद्रांमध्ये असलेल्या समस्या सोडवायच्या आहेत. त्यानंतर यातील सर्वोत्तम अशा ७ नागरी केंद्रांना गौरविण्यात येणार आहे.

पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात असलेल्या असलेल्या समस्या सोडवून रुग्णांना तेथे येण्यास प्रवृत्त करण्यासाठी पालिकेने कायाकल्प ही संकल्पना राबविली आहे. याद्वारे सर्व नागरी आरोग्य केंद्रातील अडचणी सोडविण्यात येणार आहेत. यासाठी एप्रिल आणि मे महिन्यात तेथील कर्मचाऱ्यांना यासाठी ट्रेनिंग देण्यात आली आहे. या ट्रेनिंगमधून कर्मचाऱ्यांना येथील सुविधा सुधारण्याच्या दृष्टीने माहिती देण्यात आली. तसेच या सर्व गोष्टी रुग्णसेवेच्या दृष्टीने कशा महत्त्वाच्या आहेत त्याचे महत्त्व देखील पटवून देण्यात आले आहे. याचसोबत रुग्णांना नागरी आरोग्य केंद्रात यावे वाटले पाहिजे यासाठी सर्वोतोपरी उपयोजना करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

यात प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपल्या नागरी आरोग्य केंद्रातील सुविधा वाढवून समस्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचे आहेत. रुग्णालयातील गुणवत्ता आणि दर्जा सुधारण्यासाठी भर द्यायचा आहे. यात अपकीप म्हणजेच सुधारणा, स्वच्छता, जैविक कचरा व्यवस्थापन, संसर्ग नियंत्रण, अतिरिक्त सुविधा आणि आरोग्यदायी प्रोत्साहन, आरोग्य केंद्रातील छोट्या मोठ्या गोष्टी त्यात बसण्याच्या सुविधा, दार खिडक्यांची दुरुस्ती, पाण्याची सुविधा या गोष्टी विचारात घेतल्या जाणार आहेत. आरोग्य सुविधा सुधारण्याच्या दृष्टीने ही काही मापदंडके ठरवून दिली आहेत, अशी माहिती उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in