पर्यावरणाच्या दृष्टीने 'बेस्ट' पाऊल, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारणार

मुंबई प्रदूषणमुक्त करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने पाऊल उचलले असून, बेस्टच्या ताफ्यात पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बसेसचा समावेश होत आहे.
पर्यावरणाच्या दृष्टीने 'बेस्ट' पाऊल, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारणार

पर्यावरणाच्या दृष्टीने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर ही काळाची गरज आहे. इलेक्ट्रिक वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता भविष्यात चार्जिंग स्टेशनची कमतरता दूर करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने बस थांबे व डेपोत चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या बेस्ट उपक्रमाच्या पाच बस आगारात ८६ चार्जिंग पॉइंट्स असून आणखी ३३० चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली. दरम्यान, चार्जिंग पाइंट्समुळे खासगी वाहनधारकांची गैरसमज दूर होणार आहे.

मुंबई प्रदूषणमुक्त करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने पाऊल उचलले असून, बेस्टच्या ताफ्यात पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बसेसचा समावेश होत आहे. बेस्ट उपक्रमाने इलेक्िट्रक बसेसच्या चार्जिंगसाठी पाच ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले असून, ८६ पॉइंट्स उपलब्ध करण्यात आले आहेत. सध्या बेस्ट उपक्रमाच्या मालकीच्या इलेक्िट्रकतर भाडेतत्त्वावरील ३८६ ई-बसेस आहेत. तर २०२३ पर्यंत इलेक्टि्रक बसेसचा ताफा तीन हजारांच्या घरात असेल. २०२८पर्यंत १०० टक्के इलेक्िट्रक बसेसचा समावेश बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात होणार आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी खासगी वाहनधारकांचाही इलेक्टि्रक वाहन खरेदीकडे कल वाढला आहे. त्यामुळे भविष्यात चार्जिंग स्टेशनची कमतरता भासू नये, यासाठी बेस्ट उपक्रमाने इलेक्िट्रक चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला असून, ३३० चार्जिंग स्टेशन उभारण्याचे प्रस्तावित असल्याचे चंद्र यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in