गुवाहाटीला आमदार थांबलेल्या हॉटेलचे बिल आले समोर, एवढे लाख झाले खर्च

हॉटेलच्या वेगवेगळ्या मजल्यावर ७० खोल्या बुक केल्या होत्या. हॉटेलमध्ये न राहणाऱ्या लोकांसाठी २२ ते २९ जून दरम्यान भोजन व अन्य सुविधा बंद केल्या होत्या
गुवाहाटीला आमदार थांबलेल्या हॉटेलचे बिल आले समोर, एवढे लाख झाले खर्च
ANI

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीच्या ब्ल्यू रॅडिसन हॉटेलमध्ये आठ दिवस थांबले होते. या आठ दिवसांचे हॉटेलचे बिल ९२ लाख रुपये झाले. या बिलाची रक्कम अदा करण्यात आल्याची माहिती हॉटेलच्या अधिकाऱ्यांनी दिली. यात खोल्यांचे भाडे ७० लाख तर २२ लाख रुपये जेवणाचे बिल झाले.

हॉटेलच्या वेगवेगळ्या मजल्यावर ७० खोल्या बुक केल्या होत्या. हॉटेलमध्ये न राहणाऱ्या लोकांसाठी २२ ते २९ जून दरम्यान भोजन व अन्य सुविधा बंद केल्या होत्या.

या हॉटेलच्या अधिकाऱ्याने सांगितले की, हे सर्व आमदार सर्वसामान्य पाहुण्यांसारखे राहिले. त्यांनी कोणतेही पैसे ठेवले नाहीत. हे आमदार डिलक्स श्रेणीच्या खोलीत राहिले.

रॅडिसन ब्ल्यू हॉटेलच्या वेबसाईटनुसार, या हॉटेलचे दर रोज बदलत असतात. सुपीरियर खोलीचे भाडे ७५०० तर डिलक्स खोलीचे भाडे ८५०० रुपये आहे. त्यामुळे ७ दिवसांचे भाडे ७० लाख रुपये झाले. तर जेवणाचे २२ लाख रुपये झाले. तसेच या आमदारांनी केवळ कॉम्प्लेमेंटरी सेवेचा लाभ घेतला. त्यांनी कोणतीही पेड सेवा घेतली नाही, असे हॉटेलचा अधिकारी म्हणाला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in