२ टक्के दंड अन् मालमत्ताही जप्त; थकबाकीदारांना पालिकेचा इशारा

बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांना दिलेल्या मुदतीत करभरणा करता यावा, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाच्या वतीने वेळोवेळी व्यापक जनजागृती करण्यात येत आहे.
२ टक्के दंड अन् मालमत्ताही जप्त; थकबाकीदारांना पालिकेचा इशारा

मुंबई : थकबाकीदारांना मालमत्ता कर भरण्यासाठी २५ मेपर्यंतची मुदत दिली आहे. २५ मेपर्यंत थकीत मालमत्ता कर न भरल्यास २ टक्के दंड आकारण्यात येईल आणि दंड आकारल्यानंतर करभरणा न केल्यास संबंधितांची मालमत्ता जप्त करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे २५ मेपर्यंत कर भरा आणि कारवाई टाळा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. दरम्यान, १ एप्रिल २०२३ ते १५ एप्रिल २०२४ पर्यंत तब्बल ३,३९८ कोटींचा कर जमा झाल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर १ एप्रिल २०२४ ते आतापर्यंत २००.८९ कोटींचा कर जमा झाला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांना दिलेल्या मुदतीत करभरणा करता यावा, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाच्या वतीने वेळोवेळी व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. मालमत्ताधारकांच्या सोयीसाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही विभाग (वॉर्ड) कार्यालय तसेच नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवण्यात आले आहेत. तसेच या संबंधी अडचणींचा निपटारा करण्यासाठी कर निर्धारण व संकलन विभागाचे अधिकारी, कर्मचारी अविरत कार्यरत आहेत. तरी अद्याप करभरणा न केलेल्या मालमत्ताधारकांनी वेळीच कर जमा करुन दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

‘टॉप-१०’ मालमत्ताधारक

सिद्दीक एम. आफिजी (आर उत्तर विभाग)

०२ कोटी २७ लाख ९४ हजार ०७१ रुपये

कमला मिल्स लिमिटेड (जी दक्षिण विभाग)

०२ कोटी २४ लाख ०५ हजार ७०८ रुपये

ओम ओमेगा शेल्टर्स (जी दक्षिण विभाग)

०२ कोटी २३ लाख ११ हजार ९७० रुपये

श्री समर्थ स्पार्क डेव्हलपर्स (टी विभाग)

०२ कोटी १४ लाख ०६ हजार ७८६ रुपये

ट्रान्सकॉन शेठ क्रिएटर्स प्रा. लि. (पी उत्तर विभाग)

०२ कोटी १२ लाख ९५ हजार ८१८ रुपये

रिलायन्स कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (जी दक्षिण विभाग)

०२ कोटी १० लाख ८७ हजार १७९ रुपये

श्री गणपत गणरू काटकर (एच पूर्व विभाग)

०२ कोटी ०९ लाख १४ हजार ६४७ रुपये

पंचशील गृहनिर्माण संस्था (जी दक्षिण विभाग)

०२ कोटी ०७ लाख ४७ हजार ४४४ रुपये

लेझर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लिमिटेड (टी विभाग)

०२ कोटी ०४ लाख १५ हजार ९५६ रुपये

लोखंडवाला बिल्डर्स (जी दक्षिण विभाग)

०२ कोटी ४४ हजार ३६० रुपये

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in