मुंबईत आज १५ टक्के पाणीकपात

पालिका प्रशासनाने रबरी ब्लाडर दुरुस्तीचे काम १८ मार्च रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत युद्धपातळीवर पूर्ण केले.
मुंबईत आज १५ टक्के पाणीकपात

मुंबई : पिसे बंधाऱ्यातील ३२ पैकी एका गेटमध्ये बिघाड झाला आणि पाणीगळती सुरू झाल्याने बंधाऱ्यातील पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. त्यामुळे आज मुंबईत १५ टक्के पाणीकपात करण्यात आल्याचे पालिकेच्या जल विभागाकडून सांगण्यात आले. पिसे येथील बांधावरील गेटच्या ३२ पैकी एका रबरी ब्लाडरमध्ये शनिवार, १६ मार्च रोजी अचानक बिघाड झाल्याने पाणीगळती सुरू झाली. सदर ब्लाडरची दुरुस्ती करण्यासाठी पिसे येथील पाण्याची पातळी ३१ मीटरपर्यंत खाली आणण्यात येत आहे. यासाठी भातसा धरणातून येणारा पुरवठा नियंत्रित करावा लागला आहे. यानंतर पालिका प्रशासनाने रबरी ब्लाडर दुरुस्तीचे काम १८ मार्च रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत युद्धपातळीवर पूर्ण केले. आता भातसा धरणातून पुन्हा पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, बंधाऱ्याची पाणीपातळी पूर्ववत होण्याकरिता कालावधी लागणार असल्याने १९ मार्च रोजी एक दिवसासाठी संपूर्ण मुंबईत १५ टक्के पाणीकपात केली जाणार आहे.

मुंबईला असा होतो पाणीपुरवठा

भातसा धरणातून सोडण्यात आलेले पाणी पिसे येथे बंधारा बांधून तयार केलेल्या जलाशयामध्ये साठविले जाते. पालिकेच्या पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये प्रक्रिया करून येवई येथील महासंतुलन जलाशयामार्फत मुंबईकरांना हा पाणीपुरवठा केला जातो.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in