BMC Budget : मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 4 फेब्रुवारी रोजी सादर होणार

मुंबई महापालिकेच्या इतिहासात दुसऱ्यांदा प्रशासकाकडून अर्थसंकल्प सादर होणार
BMC Budget : मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 4 फेब्रुवारी रोजी सादर होणार

मुंबई महानगरपालिकेचा (BMC) 2022-23 चा अर्थसंकल्प शनिवार, 4 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. मुंबई महापालिका आयुक्त प्रशासक म्हणून मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करतील. मुंबई महापालिकेच्या इतिहासात दुसऱ्यांदा प्रशासकाकडून अर्थसंकल्प सादर होणार आहे. मुंबई महापालिकेचे प्रशासक आणि आयुक्त डॉ.इक्बाल सिंग चहल हे बजेट सादर करणार आहेत.

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना काही सूचना केल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात प्रदूषण नियंत्रण, आरोग्य यंत्रणा मजबूत करणे, प्रशासनातील पारदर्शकता आणि सुशोभीकरणाचा समावेश करावा, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. महापालिकेकडून अर्थसंकल्प सादर करताना नागरिक, राजकीय पक्षांकडून मिळालेल्या प्रतिक्रिया आणि सूचना लक्षात घेऊन अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

गतवर्षीच्या ४५९४९.२१ कोटींच्या अर्थसंकल्पात यंदाही सुमारे साडेचार हजार कोटींची वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी एकूण अर्थसंकल्पापैकी जवळपास १५ टक्के निधी आरोग्यासाठी देण्यात आला होता. यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी विशेष तरतुदी आणि नवीन योजना जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुकीपूर्वी कोणते मोठे प्रकल्प जाहीर होतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.

logo
marathi.freepressjournal.in