१८ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन व्यापाऱ्याचे पलायन

विविध व्यापाऱ्याकडून घेतलेल्या सोन्याच्या दागिन्यांची आंधप्रदेशच्या विशाखापट्टणम शहरातील व्यापाऱ्यांना विक्री करत होता.
१८ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन व्यापाऱ्याचे पलायन
Published on

मुंबई : सुमारे अठरा लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन एका व्यापाऱ्याने पलायन केल्याची घटना काळबादेवी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी राजेशभाई नगीनदास पारेख या सोन्याच्या व्यापार्‍याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे.

शेरसिंग वचनसिंग राजपूत यांचा भवानी गोल्ड नावाचा सोन्याचे दागिने होलसेलमध्ये विक्रीचा व्यवसाय आहे. काळबादेवी परिसरात त्यांचे कार्यालय असून, याच कार्यालयातून त्यांचे व्यवहार चालतात. व्यवसायानिमित्त त्यांचे महाराष्ट्रासह इतर राज्यातील काही व्यापाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण झाले होते. त्यातून त्यांची राजेशभाईशी ओळख झाली होती. तो गुजरातच्या राजकोटचा रहिवाशी असून, व्यवसायाने सोन्याचा व्यापारी आहे. राजेशभाई हा विविध व्यापाऱ्याकडून घेतलेल्या सोन्याच्या दागिन्यांची आंधप्रदेशच्या विशाखापट्टणम शहरातील व्यापाऱ्यांना विक्री करत होता.

logo
marathi.freepressjournal.in